पिंपरी : मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाउन या चारही मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांसह आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने प्रवास करण्याचा मार्ग अवलंबला. परिणामी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या संख्येत घट होऊन एसटी स्थानकांवर नेहमीपेक्षा प्रवाशांची अधिक गर्दी दिसून आली.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळातून कामानिमित्त रोज पुणे ते मुंबई ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांनी पुणे ते लोणावळा, पुणे ते कर्जत आणि मुंबई ते लोणावळा, मुंबई ते पुणे असा प्रवास करणारे प्रवासीही अधिक आहेत. लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा असा प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. पुणे-मुंबई असा रोजचा प्रवास करणाºयांमध्ये अनेक जण मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पासधारक आहेत. या पासधारकांचीही गैरसोय झाली. पर्यायी वाहतूक सुविधेचा त्यांनी पर्याय निवडला.वेळापत्रक कोलमडलेप्रवासी पास असूनही अन्य वाहन सुविधेचा पर्याय स्वीकारल्याने त्यांना खर्चाचा भूर्दंड सोसावा लागला. मध्य रेल्वेच्या परळ आणि करी रोडवरील उड्डाण पूल पदपथ कामासाठी रेल्वेच्या चारही मार्गावर हा मेगा पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मुंबईतील काही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे पुण्यातील रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे़
एक्स्प्रेस गाड्यांचा मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांची गैरसोय, खासगी वाहनांना वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:18 AM