शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत 'राडा'; सत्ताधारी सदस्यांनी फाईल भिरकावत केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 7:33 PM

भाजपच्या दोन नगरसेवकांनी गोंधळ घातला

पिंपरी : टक्केवारीवरून मागील आठवडयाची स्थायी समिती तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात स्थायी समिती सभेत वाद झाला आहे. आचारसंहितेत सभा कामकाज करता येत नाही, असे स्पष्ट असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभा तहकूबीचा निरोप का दिला नाही, यावरून काचेचा ग्लास फोडला, फाइल भिरकवून ध्वनीवर्धकही तोडला.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. कोरोना कालावधीत सभा कामकाज ऑनलाईन पद्धतीने घ्यावे अशा सूचना आहेत. त्यामुळे समितीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक  जाहीर झाली आहे. पालिका पदाधिकांऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. असे असताना सभा घ्या असा अट्टहास भाजपच्या काही सदस्यांनी धरला होता. त्यामुळे सभेचे कामकाज झाले. सभागृहात अध्यक्ष संतोष लोंढे, भाजपचे अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम आणि अभिषेक बारणे हे चार सदस्य उपस्थित होते. तसेच इतर काही सदस्य ऑनलाईनवरही गैरहजर होते. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर शासकीय कामानिमित्त मुंबईला गेल्याने त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त अजित पवार प्रमुख म्हणून उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त सुभाष इंगळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार, संजय घुबे,  उपस्थित होते. 

सभा कामकाजात उपस्थितांचे स्वागत करुन अध्यक्षांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब केली. ते सभागृहातून बाहेर पडले. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी अजित पवार यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सभा तहकूब होण्याचा निरोप आम्हाला अगोदर का सांगितला नाही, असा आक्षेप घेतला. आयुक्त का गैरहजर आहेत.आम्ही त्यांचा निषेध करायचा का, असे सुनावले. तसेच एका नगरसेवकाने ग्लास फोडला तर दुसऱ्याने फाईल भिरकावली, माईकची तोडफोड केली. अचानक घडलेल्या घटनेने अधिकारीही अवाक् झाले...........चिंचवड विरूद्ध भोसरी असे गटबाजीविविध विषयांवरून आता चिंचवड विधानसभेतील सदस्य आणि भोसरी विधानसभेतील सदस्य अशी गटबाजी सुरू झाली आहे. अध्यक्ष हे भोसरी विधानसभेतील असल्याने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चिंचवडकरांकडून केला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाshravan hardikarश्रावण हर्डिकर