लोणावळा : लोणावळा उपविभागीय पोलीस क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या वतीने लोणावळा शहरात सामाजिक ऐक्य पंधरवड्यानिमित्त सामाजिक संदेश देण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन केले होते. या मानवी साखळीत विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण व कामशेत पोलीस ठाण्यांच्या वतीने मंगळवारी सकाळी लोणावळ्यात सामाजिक ऐक्य पंधरवड्यानिमित्त सामाजिक ऐक्यासाठी मानवी साखळीचे आयोजन केले होते. सामाजिक पंधरवड्यांतर्गत मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिकांना वाहतुकीचे नियमांची माहिती व्हावी. तसेच सर्व समाजांचे विविध राष्ट्रीय, पारंपरिक व सांस्कृतिक सण, उत्सव हे मोठ्या गुण्यागोविंदाने निर्विघ्न साजरे व्हावे. या माध्यमातून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता अबाधित राहावे, यासाठी या मानवी साखळीद्वारे संदेश देण्यासाठी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येत्या शनिवारी लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह इच्छूक विद्यार्थी व नागरिकांसाठी ३ आणि ५ किलोमीटर अंतराच्या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.मानवी साखळीचे उद्घाटन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले. या वेळी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, इकबाल शेख, प्रकाश शितोळे, वैभव स्वामी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच व पोलीस मित्र उपस्थित होते.भावी नागरिक : शिवाजी चौकापासून सुरुवातया मानवी साखळीमध्ये लोणावळा महाविद्यालय, सिंहगड कॉलेज लोणावळा, कामशेत येथील तुलशियान इंजिनिअरिंग कॉलेज, एसपीएम हायस्कूल, कामशेत या महाविद्यालय व विद्यालयांचे सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. लोणावळ्यातील कुमार चौक ते शिवाजी चौकापर्यंत मानवी साखळी काढण्यात आली होती.