पिंपरी : महामेट्रो कंपनीने मेट्रोच्या स्टेशनसाठी महापालिकेकडे एकूण १२ जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये वल्लभनगर येथील वाहनतळाची जागा स्टेशनसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. भूसंपादनप्रक्रियेची तपासणी करून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.स्वारगेट ते पिंपरी मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे महामेट्रोने महापालिकेकडे जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, जागेची उपलब्धता आणि भूसंपादनाची प्रक्रिया तपासून जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याविषयीचा निर्णय सर्वसाधारण सभा घेणार आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याविषयी महामेट्रोशी पत्रव्यवहार केला आहे. त्यावर डीपीआर बनविण्यासाठीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. भविष्यातील शहराच्या वाहतुकीची गरज लक्षात घेऊन निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका नेण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थिक निधी महापालिकेला उभारावा लागणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.आयुक्त म्हणाले...- बीआरटी प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात- निगडीच्या मेट्रो मार्गासाठी खर्चाची तयारी-एम्पायर पुलाच्या ठिकाणी शहरहितासाठी रॅम्प- नदीतील जलपर्णी लोकसहभागातून काढणार- डॉ. पवन सावळे यांचा कायदेशीर प्रक्रियेनंतर निर्णय- अहवालानंतर संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाई- शहरात हॉकर व पार्किंग झोनच्या धोरणाचा प्रस्ताव
वल्लभनगरच्या जागेत मेट्रो स्टेशन; पालिकेकडे १२ जागांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:11 AM