पिंपरी : मेट्रो प्रकल्पासाठी उभारण्यात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार मेट्रोचे पहिले स्थानक पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे होणार आहे. या स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रीज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे.संत तुकारामनगर येथे उभारण्यात येणारे स्थानक व ओव्हर ब्रीजचे सर्वेक्षण २८ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, जिओ टेक्निकल सर्व्हे प्रगतिपथावर आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दुसºया बाजूला वल्लभनगर बस स्थानक व आयटी इंडस्ट्री यांना जोडण्यात येणार आहे. सदर पुलाची लांबी ही ६५ मीटर तर रु ंदी ६ मीटर इतकी असणार आहे. याचा उपयोग मेट्रो स्थानकावर उतरणाºया प्रवाशांबरोबरच या भागातील पादचाºयांनाही होईल. याशिवाय सदर पूल हा जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणार आहे. तो वास्तुस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असेल. याशिवाय नवीन पूल बांधल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
संत तुकारामनगरमध्ये मेट्रोचा ओव्हर ब्रीज, वल्लभनगर व आयटी इंडस्ट्रीला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 3:12 AM