पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिकेचा पहिल्या ‘व्हाया डक्ट सेगमेंट’चे काम नाशिक फाटा येथे पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा महामेट्रो कंपनीने केला आहे.महामेट्रोने पिंपरी ते स्वारगेट या मार्गिकेवरील नाशिक फाटा येथे ‘प्री स्ट्रेसड सेगमेंटल बॉक्स गर्डर’ तंत्रज्ञांच्या माध्यमाने या सेगमेंटची निर्मिती केली आहे. साधारण ४५ टन वजनाचे सेगमेंट बसविताना २०० टन वजनाच्या क्रेनचा वापर करण्यात आला. साधारणपणे २८ मीटर गर्डरकरिता १० सेगमेंट वापरले जातात. या सेगमेंटच्या निर्मिती दरम्यान गुणवत्तेसंबंधी अतिशय कठोरपणे चाचणी केली आहे.रुळ बसविण्यास होणार सुरुवात‘अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट’ नावाच्या अतिशयखडतर चाचणीचा देखील यात समावेश आहे. या सर्व चाचण्या सेगमेंट लाँच होण्याच्या आधी केल्या आहेत. व्हाया डक्टच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोचे रुळ बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुणे मेट्रो आणि ब्युरो व्हेरिटासबरोबर झालेल्या करारानंतरची ही दुसरीमहत्त्वाची घटना आहे, अशी माहिती मुख्य प्रकल्प अधिकारी सुनील म्हस्के यांनी दिली.
पिंपरीत मेट्रोचा पहिला ‘व्हाया डक्ट सेगमेंट’, महामेट्रोची माहिती, नाशिक फाटा येथे उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:53 AM