शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण मुक्ततेसाठी एमआयडीसीने शुद्धीकरण प्रकल्प उभारावेत- एकनाथ शिंदे

By विश्वास मोरे | Published: June 16, 2023 7:24 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात शिंदे बोलत होते...

पिंपरी : इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प बाबत केंद्र सरकारकडे निर्णय प्रलंबित आहे. तर पवना सुधार प्रकल्प आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात यवा. त्यास तातडीने मंजुरी दिली जाईल, एमआयडीसीने  पवना, इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी जल शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याची सूचना उद्योग मंत्र्यांना केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

थेरगाव येथील कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त शेखर सिंह, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, पीएमआरडीएचे अध्यक्ष राहुल महिवाल, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी अशा विविध घटकांसाठी इतिहासामध्ये पहिल्यांदा चांगले निर्णय घेतले आहे. इकडे वाचायला सुरुवात केली तर दिवस पुरणार नाही.

यापूर्वीचे सरकार अमेरिकेत, जपानमध्ये लॉक डाऊन वाढला, की आपल्याकडे लॉक डाऊन व्हायचा.  आम्ही सगळे उघड करून टाकले. घाबरून राहिलो असतो तर कोविडने आपल्याला धरल असतं, मोकळे झाल्यामुळे कोविड पळून गेला. सरकार खोटे काम करत नाही. खोट आश्वासन देत नाही.घरात बसून आदेश देत नाही. उत्पन्न दाखला पाच वर्षासाठी चालेल! 

विविध शासकीय योजनांसाठी उत्पन्नाचा असणारा दाखला प्रतिवर्षी काढावा लागतो, याबाबत शिंदे म्हणाले, विविध योजनांसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही. एक दाखला पाच वर्षांसाठी चालेल, याबाबत निर्णय घेण्यात येईल. मोशीत छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारण्यात येणार आहे त्यासाठी अडीच एकर देण्यात येणार आहे. पूर्वीच सरकार घरी होते. आपण लोकांच्या घरी आलो आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

युती मजबूत मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार!जाहिरातबाजी वरून मुख्यमंत्री म्हणाले, ''शिवसेना-भाजप युती मजबूत आहे. एका जाहिरातीने ही युती तुटणार नाही. कुणीतरी सर्व्हे केला त्यात राज्यात सरकारने चांगलं काम केले आहे, असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात नंबर वन होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रऐवजी गुजरात क्रमांक एकवर होता, त्यानंतर कर्नाटक एक नंबर होता. आणि आमचे महिन्याचे सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. १लाख १० हजार कोटी परकीय गुंतवणूक झाली आहे.''

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदे