पिंपरी : कंपनीचे मालकाने दिलेल्या अधिकाऱांचा वापर करून खोट्या दस्तऐवज करत कंपनीतून ९२ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. ही घटना सन २०१३ ते सन २०२१ या कालावाधीत फोल्कोईमोटर्स प्रा. ली, मोरवाडी, पिंपरी येथे घडला.
या प्रकरणी महिलेने मंगळवारी (दि.१६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी राकेश धवन उर्फे राकेशकुमार धवन (वय ५४, रा. अमेरिका), दीपक अंकुश क्षीरसागर (वय ३७, रा.चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भारतात नसताना त्यांनी कंपनीचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपींना अधिकार दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करून फाल्कोई मोटर्स प्रा ली कंपनीच्या २०१६, २०१७ व २०१८ च्या बोर्ड मिटींगमध्ये फिर्यादी या हजर असल्याचे दाखवून आरोपी दीपक क्षीरसागर याने फिर्यादीची खोटी सही केली. या खोट्या सही द्वारे आरोपीने स्वत:ला फिर्यादींचा रिप्रेजेंटेटीव्ह म्हणून निवड झाल्याचे दाखवले.
तसेच कंपनीच्या २०१५ ते २०१८ च्या ऑ़़डीट रिपोट, बॅलेन्ससीट, प्रॉफीट अँण्ड लॉस स्टेटमेंन्ट आदी कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केल्या. ही सर्व कागदपत्रे आरोपीने सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करून त्याचा वापर कंपनीच्या कायदेशीर कामासाठी केला. तसेच आरोपींनी संगणमत करत खोटे दस्त ऐवज तयार करून ९२ लाख ९८ हजार ९०० रुपयांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.