वाकड : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्रानेच मित्रावर दोन साथीदारांसह कोयत्याने जीवघेणा हल्ला करीत त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास वाकड रस्त्यावरील यमुनानगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राजू रफिक मुलाणी (वय २४, रा यमुनानगर, वाकड रोड, वाकड) असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून जलालुद्दीन ऊर्फ सोन्या शेख (वय २०, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड रोड वाकड) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला वाकड पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे, तर ताज शेख (वय १९, रा. जांबे) हा फरार आहे.याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीश माने यांनी दिलेली माहिती अशी - राजू व जलालुद्दीन ऊर्फ सोन्या हे एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होती. त्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्याची योजना जलालुद्दीन ऊर्फ सोन्या शेख याने आखली. आपल्या दोघा मित्रांसह त्याने राजूवर पाळत ठेवली. शुक्रवारी राजू दुचाकीवरून वाकडच्या दिशेने जात असताना त्याला अडवून सोन्या व त्याच्या साथीदारांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि तसेच दुचाकीची तोडफोड करून अंधाराचा फायदा घेत हे सर्वजण पसार झाले. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.दिघीत खोडसाळपणे पेटविली दुचाकीपिंपरी : दिघी येथे समर्थनगर येथे अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने दुचाकी पेटवली. यामध्ये दुचाकीचे साडेतीन हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजू शब्बीर खान (वय ३५) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थनगर येथे राजू खान यांनी दुचाकी उभी केली होती. कोणीतरी खोडसाळपणे दुचाकी पेटवून नुकसान केले. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.सांगवीत दुचाकीची चोरी४पिंपरी : शितोळे चौक, सांगवी येथे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. या प्रकरणी फिर्यादी बाबुलाल प्रभातील सोनी (वय ६२) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी बाबुलाल सोनी यांनी २२ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास शितोळे चौकात दुचाकी उभी केली होती. एमएच १४ ईआर ९५२० या क़्रमांकाची दुचाकी चोरट्याने पळवून नेली. फिर्यादीने तक्रार नोंदविल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.क्रेडिट कार्डचा गैरवापर;एक लाखाची फसवणूक४पिंपरी : वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या अनिकेत अशोक बाचल (वय ३१) यांच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवून त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसºया खात्यावर वर्ग केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार चिंचवड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे राहणारे अनिकेत बाचल यांची आरोपीबरोबर इंटरनेटवर चॅटिंग करण्यातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी क्रमांक मिळविला.