शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:47 PM

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश लांडगे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांचा मुलीच्या मांडव डहाळा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रोल झाला. त्यामुळे लग्नाची नियोजित तारीख लांब असतानाच आळंदीत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत आज साधेपणाने विवाह सोहळा केला. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पन्नास जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचेआमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी आणि रावेत येथील नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद याांचा विवाह येत्या सहा जूनला करण्याचे नियोजन केले होते. त्यानिमित्ताने रविवारी भोसरी गावातील लांडगे आळीमध्ये रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास निमित्ताने मांडव डहाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्या साक्षी हिची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. बैल गाडीचं सारथ्य चुलते सचिन लांडगे करीत होते. बैलगाडी घराजवळ आली असताना कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली.  तसेच हलगी वादन सुरू झाले. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हलगीच्या तालावर कार्यकर्त्याबरोबर ताल धरला. यावेळी उपस्थितांनीही आनंदात सहभाग घेतला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर टीका झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाहीर कार्यक्रमांना बंदी असताना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मांडव डहाळा मिरवणुक आयोजित करणे योग्य होते का? अशी मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता.

दरम्यान हा विवाह सोहळा ६ जून राजस्थान किंवा गोवा येथे होणार होता. मात्र, लॉकडाउन वाढविल्याने सोमवारी सकाळीच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर दर्शन घेऊन घरातील लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

सचिन लांडगे म्हणाले, ‘‘मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार २५  मोजक्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा केला. मात्र, समारंभ ठिकाणी काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहीले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचे उल्लंघन झाले. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.  पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीMLAआमदारBJPभाजपाmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या