लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ईदसाठी वर्गणी दिली नाही, म्हणून जमाव जमवून आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन गटातील २० जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गणी दिली नाही म्हणून ११ जणांच्या जमावाने मारहाण केली. तलवार, लोखंडी सुरा, बांबूने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद नूर बदनकारी (वय २८, गुलाबनगर, दापोडी) यांनी सांगवी पोलिसांकडे दिली आहे. फिरोज खान, इब्राहिम शेख, रमजान शेख, ताज शेख, मन्सूर शेख, अश्पाक मणियार, चाँद शेख, चिक्या शेख, जमिल खान, मजहर आणि एक महिला अशा ११ आरोपींविरोधात त्यांनी फिर्याद दिली आहे. तर मुन्ना ऊर्फ मोईद्दीन (वय २२, आबा काटे चाळ, दापोडी) यांनीही दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहदअली पटेल, नूर बदनकारी, मुस्तफी शेख, रिहान शेख, बाबा बदनकारी, मुजाहिद बदनकारी, अदनान शेख, अल्ताब बदनकारी, मुजीब शेख या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजाहिद बदनकारी याने फिर्यादी व सहकारी अश्पाक याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्याचा प्रयत्न केला. जिवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
वर्गणी न दिल्याने जमावाकडून मारहाण
By admin | Published: June 25, 2017 4:50 AM