: सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. सरकारने जिल्हा बँकांवर निर्बंध लादल्याने शेतकºयांचे अतोनात हाल झाले. जिल्हा सहकारी बँका ठप्प झाल्या. शेतकºयांना पैसे भेटत नाहीत. या सरकारकडून किती काळा पैसा जमा झाला याची उत्तरे दिली जात नाहीत. पंतप्रधान म्हणतात, मी फकीर आहे, पण सर्वसामान्य माणूस संसारी आहे. हे त्यांच्या का लक्षात येत नाही? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. तरीही नेते व कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे दर्शन
झालेच. कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा प्रथम नेत्यांना पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची शपथ घ्यायला लावा, अशी आग्रही मागणी केली.
‘‘मावळातील नेते मंडळींत मतभेद व दुफळी होत असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणू’’ अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केली.
त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते व अनेक पदाधिकाºयांमधून आवाज आला, ‘आधी पक्षाच्या नेते मंडळींना शपथ द्यायला लावा, मग आम्ही घेऊ’. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर सुरू होता.