शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

पावसाळ्यापूर्वीची नाले स्वच्छता

By admin | Published: June 02, 2016 12:28 AM

येथील नाले महापालिकेतर्फे नुकतेच स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नागरिकांना आश्चर्यचकित केले आहे.

निगडी : येथील नाले महापालिकेतर्फे नुकतेच स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नागरिकांना आश्चर्यचकित केले आहे. नालेसफाईसाठी महापालिकेने निविदा काढावी. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्याची स्वच्छता व्हावी, अशी मागणी विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली जात आहे. मात्र, निगडी येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेत या परिसरातील नाले स्वच्छ केले. तेथील घाण आणि कचरा बाहेर काढून विल्हेवाट लावली. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी काढून टाकली. नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जात आहे. सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामामुळे त्यांना महापालिकेचे पुरस्कार मिळाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे. महापालिकेच्या प्रशासकीय सुधारणा व गतिमानता अभियानांतर्गत १० कलमी कार्यक्रमात विविध विभागांमध्ये प्रभाग स्तर, महापालिका स्तर व प्रशासकीय स्तर प्रोत्साहनपर स्पर्धा घेते. यामध्ये निगडी हिंदू स्मशानभूमीला प्रथम क्रमांक व ५० हजार रुपये आणि मुस्लिम दफनभूमीला द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. नगरसेविका अश्विनी चिखले यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. (वार्ताहर)