रहाटणी : आपण राहत असलेला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे व त्यासाठी सर्वांची साथ मिळणे महत्त्वाचे असते. याप्रमाणेच सर्वांच्या सहभागातून रोझलँड सोसायटीत विविध प्रयोग राबविले जातात. कचरा प्रक्रिया, सांडपाण्याचा पुनर्वापर व महिन्याला लाखो रुपयांच्या विजेची बचत अशा प्रयोगशील सोसायटीची दखल भारत सरकारने घेऊन राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर केला आहे.केंद्र शासनाचा पुरस्कार मिळविणारी पिंपरी-चिंचवड शहरातील ही पहिली सोसायटी आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोसायटीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना केंद्रीय शहरविकास मंत्रालयातर्फे खास निमंत्रण पाठविण्यात आले आहे. रोझलँड रेसिडेन्सी ही सोसायटी सुमारे २२ एकर जागेत वसलेली असून, या ठिकाणी ९९६ फ्लॅट आहेत. त्यात ३२०० लोक वास्तव्यास आहेत. या सोसायटीतील रहिवासी वेगवेगळ्या राज्यांतील असले, तरी या ठिकाणी एकदिलाने व एकविचाराने राहत आहेत, माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर यांनी दिली.रेन वॉटर हार्वेस्टिंग अन् टँकरमुक्तीसोसायटी दर महिन्याला लाखो रुपये वीज बचत करीत आहे. तसेच पाणी वाचविण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती करून टँकरमुक्त सोसायटी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही अत्याधुनिक यंत्रणासुद्धा वापरण्यात आली आहे.वृक्षलागवड अन् किलबिलाट...पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी त्यांनी दर वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्याची कावकाव, पोपट-मैना यांचा मंजूळ स्वर आणि इतर पक्ष्यांचा किलबिलाट सोसायटीत ऐकू येतो.कचºयाचे विभाजनओला व सुका कचरा, ई-कचरा, प्लॅस्टिक कचरा यांचे विभाजन करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात ही सोसायटी अग्रगण्य आहे. सोसायटीने झाडांच्या पालापाचोळ्यापासून बनविलेल्या खताला मोठी मागणी आहे. काही रहिवासी घरातच कचºयाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावून खत तयार करीत आहेत.ज्या वेळेस आम्ही सोसायटीधारक येथे वास्तव्यास आलो, त्या वेळेपासून आम्ही इतर सोसायट्यांपेक्षा काही तरी वेगळा प्रयोग करण्याचा विचार करीत होतो. सोसायटीत मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारचा कचरा निघत होता. त्यावर काय करता येईल याची चाचपणी केली. ओला व सुका कचरा, ई-कचरा, पालापाचोळा, प्लॅस्टिक कचरा वेगळा करण्याची संकल्पना सुचली. तेव्हापासून आम्ही कचºयाचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. पिंपळे सौदागरमधील सर्वच सोसायट्यांनी असे करावे यासाठी आम्ही आजही अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन मार्गदर्शन करीत आहोत. - संतोष मस्कर, अध्यक्षया सोसायटीमध्ये राज्याच्याच नव्हे, तर भारताच्या कानाकोपºयातून आलेली कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र आम्हा सर्वांचे विचार समान आहेत. त्याचाच फायदा आम्हाला झाला. आम्ही सर्वानुमते अनेक प्रकल्प राबविले. त्यामुळे भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्काराचा मान आम्हाला मिळाला. याचे सर्व श्रेय सर्वच रहिवाशांना जाते. आम्ही अजूनही जे करता येण्यासारखे आहे, ते करणार आहोत.- अनंत दफ्तरदार, सचिव
महिन्याला लाखो रुपयांची वीजबचत, प्रयोगशील रोझलँड सोसायटी, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:47 AM