शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

मोरवाडी आग प्रकरण: पर्यावरणास हानी पोहोचविल्याप्रकरणी अमृतेश्वरला दहा लाख दंड, पालिकेची कारवाई

By विश्वास मोरे | Published: March 01, 2024 9:00 AM

ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे....

पिंपरी : मोरवाडी, पिंपरी येथील मोकळ्या जागेतील भंगार मालाला लागलेल्या आगीमुळे पर्यावरणास हानी पोहोचविल्याबद्दल पुण्यातील अमृतेश्वर ट्रस्टला महापालिकेचे वतीने दहा लाख दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे. 

मोरवाडीतील पिंपरी न्यायालयाजवळ सर्व्हे क्रमांक ३०/१०/५७ येथ अमृतेश्वर कॉलनी आहे. तर पुण्यात अमृतेश्वर ट्रस्टचे कार्यालय आहे. कॉलनी शेजारी ट्रस्टची मोकळी जागा आहे. या जागेत मोठ्या प्रमाणावर भंगाराचे साहित्य होते. त्या ठिकाणी दिनांक २१ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी आग लागली. त्यानंतर पिंपरी, चिंचवड,  प्राधिकरण, भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे येथील अग्निशामक दलाचे १० बंब तसेच खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटचे ६ असे एकूण १६ बंब दाखल झाले होते. सलग दोन ते तीन दिवस ही आग धुमसत होती. तसेच ६० कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.

या घटनेमुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रबर, प्लास्टिकचे ड्रम, टायर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. 

या कलमांतर्गत झाली कारवाई पर्यावरणास हानी पोहोचविणे आणि प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण १९८६ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने पुण्यातील जंगलीमहाराज रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन नोटीस देण्यात आली. दहा लाख दंड केला आहे. हा दंड तातडीने भरण्यात यावा,  अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असे कुलकर्णी यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआग