मोशी : नामवंत मल्ल प्रसाद सस्ते याने नांदेड (ता. हवेली) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या हवेली केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी विकास धनवडे याला शून्य-दोनच्या फरकाने हरवत विजय संपादित केला असून, हवेली केसरी किताब पटकाविला आहे. त्याच्या या यशामुळे गावचा नावलौकिक अधिक वाढला असल्याचे मत मोशीकर व्यक्त करीत आहेत. प्रसादला उपमहाराष्ट्र केसरी बाबा बाणेकर, अर्जुन पुरस्कारार्थी काका पवार, नांदेडचे उपसरपंच करण कोडीतकर, तंटामुक्ती अध्यक्ष तुषार कारले, उमेश कारले, अतुल कारले, वस्ताद रामभाऊ कारले, रवींद्र मोकाशी यांच्या उपस्थितीत ३१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.कुस्ती परंपरा आजोबांपासून असल्याने प्रसादला कुस्तीकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. आॅलिम्पिकसाठी खेळण्याची त्याची इच्छा आहे. (वार्ताहर)
मोशीचा प्रसाद सस्ते ठरला ‘हवेली केसरी’
By admin | Published: March 23, 2017 4:22 AM