देहूरोड : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास देहूरोडनजीक केंद्रीय विद्यालय क्रमांक एक परिसरात महामार्गाच्या चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर निगडीतील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपाली अशोक भागवत (वय २७, रा. माढा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव असून पूजा मनोहर मुसळी (वय २७, रा. माढा, जि. सोलापूर), विश्वास बाळाप्पा तौरगली (वय ३४, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), संदीप उंबराव नरुटे (वय ३५ रा. प्राधिकरण, चिखली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. देहूरोडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या येथे केंद्रीय विद्यालय क्रमांक एकजवळ पुणे-मुंबई महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु दोन्ही बाजूंना खोदकाम करण्यात आल्याने रस्ता अरुंद व धोकादायक बनलेला आहे. या भागात पथदिवे बंद असून संबंधित रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारीच्या चालकाचे मोटारीवरील (एमएच १२ एलव्ही ०१०१) नियंत्रण सुटल्याने गाडी शेजारच्या खड्ड्यात उलटून अपघात झाला. अपघातात रुपाली भागवत या महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत.
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोटार पलटी; १ ठार, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:01 PM
पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देमहामार्गाचे काम सुरू असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी खड्ड्यात चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर खोदकाम; रस्ता बनला अरुंद आणि धोकादायक