विजय सुराणा - वडगाव मावळ : मावळ तालुक्यात काही व्यावसायिकांनी डोंगराची लचकेतोड करून मोठमोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यानंतर काही काळा हा प्रकार थांबविण्यात आला. आता महसूल व वन खात्याच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा मुरूम आणि लाल मातीचा बेसुमार उपसा सुरू आहे़ त्यामुळे मावळच्या निसर्गाला बाधा येऊन भविष्यात डोंगर टेकड्या नामशेष होण्याचा धोका आहे. तालुक्यात काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. शासनाने अशा गावांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. १९८९ मध्ये मावळातील भाजे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू झाला होता. देवघर येथे अशाच घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले होते. नायगावातील डोंगरावर तीन वर्षांपूर्वी दरड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला...........राज्यात नावलौकिक असलेल्या लोणावळा, खंडाळा शहरासह पवन मावळात दोन दशकांपासून धनिकांची नजर लागल्याने वृक्षवल्लींनी वेढलेल्या या दुमदार शहराला सर्वत्र नागरिकांचे वेध लागले आहेत. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड, डोंगराच्या टोकावर सुरू असलेला निवासी विकास यावर वेळीच निर्बंध न घातल्यास माळीण दुर्घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका होऊ शकतो. तालुक्यातील डोंगरानजीकची आठ गावे धोकादायक असून, त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु अध्याप गावांचे पुनर्वसन झाले नाही..........डोंगर उतारावरील गावांना धोका1मावळ तालुक्यातील पवन मावळात शिळीम, कादव, तुंग, तिकोना, चावसर, पुसाणे, बऊर, तसेच नाणे मावळातील नेसावे, वेहरगाव, शिलाटणे, वाकसई, मोरमारवाडी, पाले, करंजगाव, जांभवली, साई आणि आंदर मावळातील कुसूर, दवणेवाडी, नवलाख उंब्रे, निगडे, वडेश्वर, फळणे, पारिठेवाडी, किवळे, कशाळ, भोयरे, माऊ, कुसवली या गावांना धोका होऊ शकतो.
..............
वन विभागाच्या जागेतही अतिक्रमण 2ग्रामीण भागातील लाल माती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. तिचाही बेसुमार उपसा सुरू आहे. डोंगराकडेची माती उपसल्याने पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच जमीनदोस्त होण्यासारखी परिस्थिती मावळात अनेक ठिकाणी पाहवयास मिळते. तालुक्यात वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा डोंगर व झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर चालू आहे.............मावळ तालुक्यात बेकायदा खोदकाम व अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याने दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली आहे. आगामी काळातही कारवाई सुरूच राहणार आहे. - रणजीत देसाई, तहसीलदार ..............वन खात्याचे व खासगी डोंगर लागून असल्याने हद्द कळत नाही़ परंतु बेकायदेशीर डोंगर पोखरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.- सोमनाथ ताकवले, वन अधिकारी
.................
आंदर मावळ हे लाल मातीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात वडेश्वर, इंगळूण, माऊ, बोरवली इत्यादी गावांतून मोठ्या प्रमाणावर लाल माती बेकायदा डोंगर टेकड्या खोदून नेली जाते. महसूल खात्यातील काही अधिकारी गाड्या पकडण्याचे नाटक करतात. सेटलमेंट करून वाहने सोडली जातात. त्यामुळे माती उपसण्याचे काम जोमात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.