पिंपरी : महापालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती लवकरच बदलल्या जाणार आहेत. सत्ताधारी भाजपात हे बदल होत असताना, विरोधी पक्षातही कारभारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्टÑवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, व विरोधी पक्षनेते पदावर नवी व्यक्ती निवडली जाणार असल्याची चर्चा आहे.सध्या महापौर नितीन काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक आहेत. त्यामुळे आता नवीन स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आमदार लांडगे समर्थकांकडून दावा केला जात आहे. स्थायीचा अध्यक्ष त्यांच्या गटाचा झाला, तर महापौरपद आमदार जगताप समर्थकांसाठी सोडले जाण्याची शक्यता आहे. दोन टर्म नगरसेवकपदाची कारकीर्द असलेल्यास संधी दिली जाईल. महापौरपद ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे खरा ओबीसी आणि कुणबी यांच्यापैकी खºया ओबीसीला संधी मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. चिंचवडगाव आणि पिंपळे सौदागर येथून या पदासाठी इच्छुक आहेत. सभागृह नेते एकनाथ पवार भाजपाचे जुने आणि निष्ठावान आहेत. त्यांच्या जागी पर्यायी भाजपाच्या निष्ठावानाचा शोध घेतला जात आहे. त्यामध्ये अनुभवी म्हणून विलास मडेगिरी यांचे नाव घेतले जात आहे. महापालिकेतील सत्तांतराला एक वर्ष पूर्ण होत आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ७७ नगरसेवक निवडून आले. प्रत्येकाला स्थायी समितीवर संधी मिळावी, असे धोरण भाजपाने अवलंबले आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदापासून ते सदस्य बदलले जाणार आहेत. महापौर, उपमहापौर,अडीच वर्षांनी बदलले जात होते. आता मात्र दर वर्षी या पदावर नव्या लोकांना संधी दिली जाणार आहे. सभागृहनेतेसुद्धा यास अपवाद राहणार नाहीत.
कारभारी बदलाच्या हालचाली, भाजपाबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना पदाधिका-यांचाही खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:06 AM