शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पालिकेत कार्यालय मिळेपर्यंत आंदोलन

By admin | Published: March 24, 2017 4:05 AM

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या

पिंपरी : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौरांच्या दालनासमोरच कार्यालय सुरू केले आहे. खुर्च्या टाकून विरोधी पक्षनेत्यांनी सदस्यांशी चर्चा केली. कार्यालय मिळत नाही तोपर्यंत महापौर दालनाबाहेरच ठिय्या मांडणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेतेपदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे. त्यासाठी आम्ही महापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांकडे मागणी केली आहे. मात्र, भाजपाने ही मागणी धुडकावून लावली आहे. राष्ट्रवादीचा हा स्टंट आहे, अशी टीका केली आहे. मात्र, हा स्टंट नसून आमचा पारदर्शी कारभार आहे, असा टोला विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी लगावला आहे. विरोधी कार्यालयातील सर्व खुर्च्या महापौर कार्यालयाबाहेरच्या मोकळ्या जागेत मांडून स्वत: विरोधी पक्षनेते बहल यांनी बाहेरच आपले विरोधी पक्षनेते कार्यालय थाटले आहे. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्यांच्या भुवया आपोआप उंचावल्या जात होत्या. बहल म्हणाले की, विरोधी पक्ष असलो, तरी आमची सदस्यसंख्या ३६ आहे. आत्ताचे विरोधी पक्षनेते कार्यालय अतिशय छोटे आहे. त्याऐवजी आम्हाला उपमहापौर कार्यालय द्यावे किंवा इतर कोणतेही कार्यालय द्यावे जिथे आमचे ४० ते ४५ सदस्य बसू शकतील. याविषयी आम्ही आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापौर नितीन काळजे यांच्याकडे विनंती केली. मात्र, त्यांनी केवळ समजून घ्या एवढेच आश्वासन दिले. त्यासाठी आम्ही असे बाहेर कार्यालय थाटले आहे.’’ महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्याच काळातील ही रचना आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आत्ता आमचेही ७७ सदस्य आहेत. त्यांनाही महापौर किंवा सत्तारुढ पक्षनेत्यांच्या कार्यालयातही जागा पुरत नाही. सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)