पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्यातच सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणूक असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यास बराच विलंब झाला आहे. मागील आठवड्यातही हे अंदाजपत्रक सादर होणार अशी चर्चा होती. मात्र, मंगळवारी ते सादर होणार आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतरचे पहिलेच अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये काय असणार आहे, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे मंगळवारी सकाळी ११ ला आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत. पालिकेत प्रथमच भाजपाची सत्ता आली असून, भाजपाच्या राजवटीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. भाजपाच्या पहिल्याच अंदाजपत्रकात काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. समाविष्ट गावांना किती निधी असेल याबाबत उत्सुकता आहे.(प्रतिनिधी)
महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प
By admin | Published: April 17, 2017 6:40 AM