पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर परिसरातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या संदर्भातील नियमावली अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बुधवारी (दि. १७) जाहीर केले आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत कमी झालेला कोरोनाचा विळखा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाढू लागला आहे. शंभराच्या आत आलेली रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा आलेख कमी झाल्याने शिथिल केलेले निर्बंध कडक करण्याच्या उपाययोजना महापालिका प्रशासनाच्या वतीने अवलंबल्या जाणार आहेत. यासंदर्भात आज नवीन आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोनासंदर्भात बैठक घेऊन आरोग्य आणि वैद्यकीय विभागास सूचना दिल्या आहेत. तसेच
नवीन नियमावली :
१) शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी, शासकीय, खासगी कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
२) महापालिका क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालय, सांस्कृतिक सभागृह, सामाजिक धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन सभा संमेलन अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर बंधनकारक केला आहे.
४) हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहे, बाजार पेठ मॉल याठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
५) मास्क आणि थुकणाऱ्या विरोधात कारवाई तीव्र करणार आहे. मास्क वापरणारे नागरिकांना पाचशे रुपये तसेच सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या नागरिकास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकार अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले होते. मात्र यात बदल करून महापालिका आणि पोलीस कारवाई करतील.
६) महापालिकाकार्यक्षेत्रातील आठ क्षेत्रीय कार्यालय, सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह पोलिसांवरही कारवाईची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
७) नागरिकांची गर्दीची ठिकाणे शोधणे आणि गर्दीची पाहणी करण्याचे जबाबदारी सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर देण्यात आलेले आहे.
......... महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत असून याचे प्रमुख कारण नागरिक मास्क चा वापर करत नाही, नियमांचे पालन करीत नाहीत, हे दिसून आले आहे. तसेच सरसकट नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे शिथिल केलेले नियम कडक करण्यात येत आहेत. शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.''