पिंपरी : दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाची बेस्ट अॅक्सेसेबल वेबसाईट अवॉर्डसाठी निवड झाली असून उपपंतप्रधापन व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या डिसअँबेलिटीसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली संकेतस्थळे (वेबसाईट) दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कळविले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्साठी मार्गदर्शक सुचनांचा महापालिका स्तरावर अभ्यास करण्यात आला. महापालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना वापरण्यासाठी परिपूर्ण केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग,सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना हाताळण्यास उत्कृष्ट संकेतस्थळ अशी राष्ट्रीय स्तरावर माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग यांनी दिनांक ६ नोव्हेंबरला महानगरपालिकेचे संकेतस्थळाची निवड झाल्याचे कळविले होते. जागतिक अपंगदिनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाला. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणिसक्षमीकरण राज्यमंत्री विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपपस्थित होते. पारितोषिक मिळविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे महापालिकेने कळविले आहे. हा पुरस्कार महापालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी स्विकारला. महापौर राल जाधव म्हणाले, महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक आॅनलाईन सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेचे संकेतस्तळावर विविध सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळेच दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेचा गौरव झाला आहे.
दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 4:02 PM
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल,अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ठळक मुद्देदिव्यांग व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्साठी मार्गदर्शक सुचनांचा अभ्यास