पिंपरी : महापालिका हद्दीत १९९७ मध्ये १७ गावे नव्याने समाविष्ट झाली. अलिकडच्या काही वर्षात या गावठाण भागाच्या विकासाकडे लक्ष दिले गेले. शहराच्या सर्व भागांचा विकास होत गेला. समाविष्ट गावभागाकडे मात्र दुर्लक्ष झाले. शेतमाल ठेवण्याच्या, वखारी, जनावरांचे गोठे यासह ग्रामपंचायत काळातील बांधकामांना मिळकत कर आकारणी केली. सुविधांच्या नावाने शंक मिळकत कर वसूलीत आघाडी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिकनागरिकांनी मिळकतधारक संघटना स्थापन करून लढा उभारला. आताही या भागात सुविधांची कमतरता आहे. पिंपरी : महापालिका हद्दीत १९८७ चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, चिखली, कुदळवाडी, मामुर्डी, वाकड, तळवडे, पुनावळे, रावेत यासह अन्य गावांचा समावेश झाला. मात्र सुरूवातीच्या दहा वर्षात या भागाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. विकास आराखड्यातील प्रकल्प २० वर्षत अद्यापपर्यंत विकसित होऊ शकले नाहीत. गेल्या दहा वर्षात अंतग्त रस्ते तसेच रूग्णालये, शाळा असे प्रकल्प साकारले आहेत. त्यालासुद्धा वेगळे कारण आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विकासाला वाव उरला नाही. विकास प्रकल्पांसाठी जागा मिळणे कठीण झाले. बांधकाम व्यवसायिकांनीही समाविष्ट भागात जागा घेऊन आगोदरच गुंतवणूक केलेली. त्या भागात जागा उपलब्ध असल्याने बांधकाम व्यवसायाला वाव आहे. हे लक्षात येताच बांधकाम व्यवसायिकांनी मोशी,चऱ्होली, चिखली, तळवडे या भागाकडे लक्ष केंद्रित केले. मोठे गृहप्रकल्प या परिसरात साकारले जाऊ लागले. त्यामुळे समाविष्ट झालेल्या परिसरात लोकवस्ती वाढत गेली. परिणामी त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे भाग पडले. त्यामुळे या भागात सुधारणा झाल्याची परिस्थिती पहावयासमिळत आहे. डीपीतील आरक्षणे मात्र तशीच आहेत. दळणवळण सुविधा उपलब्ध व्हाव्यातचिखली, कुदळवाडी भागात दळणवळण सुविधांचा अभाव आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. पीएमपीच्या बसगाड्यांच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी रिक्षांची या भागात चलती आहे. अत्यंत धोकादायकरित्या ही अवैध प्रवासी वाहतूक या मार्गावर राजरोसपणे सुरू आहे. तीन आसनी रिक्षांमध्ये सहा ते सात प्रवाशांना दाटीवाटीने बसवले जाते. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पिंपरी येथे अथवा पुण्यात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. दळणवळणाची सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध व्हावी. कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने दक्षता महत्त्वाची चिखली, कुदळवाडी परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. अनेक गुन्हेगार कुदळवाडीत आश्रय घेतात. या भागातील रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना रूजविण्यासाठी पोलीस यंत्रणेने योग्य ती दक्षता घ्यावी.
समाविष्ट भागातील विकासाला प्राधान्याने गती द्यावी शहराच्या अन्य भागाच्या तुलनेने समाविष्ट भागात विकास कामे कमी प्रमाणात झाली आहेत. समाविष्ट गावातील नागरिकांचा मिळकत कर माफ करावा, यासाठी नागरिक आंदोलनकरत होते. आता शास्तीकराचा बोजा त्यांच्यावर टाकलेला आहे. १५ वर्षात परिस्थिती बदलुन गेलेली आहे. रस्ते, तसेच अन्य प्रकल्प साकारले असले. तरी विकास आराखड्यातील कामे केवळ २० टक्केच झाली आहेत. ८० टक्के विकास आराखड्यातील विकासकामे पूर्ण होऊ शकली नाहीत. विकासकामांना गती द्यावी. अशी मागणी होऊ लागली आहे. नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य हवेनागरिकांना काय पाहिजे, हेलक्षात घ्यावे, नागरिकांकडून मागणी होत असलेले प्रकल्प राबवले जात नाहीत. महापालिका स्तरावर अधिकारी, पदाधिकारी काय वाटते यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे २० वर्षात विकास आराखड्यातील २० टक्के आरक्षणेसुद्धा विकसित झाली नाहित. चूक झाली आहे, हे लक्षात घेऊन चूक सुधारण्याचे प्रयत्न व्हावेत. एवढीच येथील नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या मताचाही आदर व्हावा. - उदय पाटील (अध्यक्ष)प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना व्हाव्यातचिखली परिसरात प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. मैला सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने इंद्रायणी नदीपात्र प्रदुषित होते. कुदळवाडीत वारंवार भंगार मालाच्या गोदामांना आग लागते. भंगार मालाला आग लागण्याच्या घटना या परिसरात नित्याच्याच झाल्या आहेत. हे या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. भंगार मालाची आग कायम धुमसत राहात असल्याने धुराच्या प्रदुषणाचाही धोका वाढला आहे. त्यावर वेळीरच नियंत्रण आणावे - संभाजी बालघरे उद्याने,खेळाची मैदाने असावीतमहापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात विशेषत: चिखली, कुदळवाडीत अद्याप महापालिकेचा दवाखाना नाही. उद्याने, खेळाची मैदाने विकसित झाली नाहित. जेवढी कामे झाली ती विकास कामे म्हणता येणार नाही. एक प्रकारची सूज आहे. खऱ्या अर्थाने विकास कामे केली जावीत. अंतर्गत रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात या भागात उपलब्ध झालेल्या नाहित. किमान मुलभूत सुविधा मिळत नाहित, तर वाचनालय, खेळाची मैदाने कधी होणार - संजय नेवाळे
आम्हाला हे हवे... शाळेचे भूमीपुजन झाले, जाण्यासाठी रस्ता हवानदी प्रदुषणावर नियंत्रण हवेमुलभुत सुविधा द्यारूग्णालय सुरू करावेउद्याने, खेळाची मैदाने विकसित करावीत.विकास आरखड्यातील कामे पूर्ण करा