पिंपरी : महापालिकेच्या खर्चाने दौरे करण्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने भर दिला आहे. गुजरामधील अहमदाबादला नगरसेवक आणि पदाधिका-यांची टूर निघाली आहे. आॅक्टोबर महिन्यात दोन, तर नोव्हेंबर महिन्यात एक अशा तीनदा सहली जाणार आहेत. त्यावर सुमारे ३८ लाखांचा खर्च होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर अभ्यास दौºयांच्या माध्यमातून सहलींचे आयोजन केले जात होते. अभ्यास दौरे करा, परंतु त्याचा अहवाल सादर करा, अशी अट स्थायी समितीने दौरा करणाºयांपुढे ठेवली आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने एक अभ्यास दौरा झाल्यानंतर मागील आठवड्यात एका ठेकेदाराच्या मदतीने सिंगापूर दौराही झाला होता. त्यानंतर बीआरटी विषयक अहमदाबाद दौरा काढण्यात येणार आहे.२६ ते २८ आॅक्टोबर, २९ ते ३१ आॅक्टोबर, १ ते ३ नाव्हेंबर रोजी हा दौरा होणार आहेत. त्यात महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी आणि अधिकारीसहभागी होणार आहेत. या दौºयात १३३ नगरसेवक, २१ अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे.
महापालिका खर्चाने नगरसेवकांचे दौरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 2:56 AM