पिंपरी : महापालिकामधील रिक्त जागांवर खासगी कंत्राटाऐवजी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी संप होणार आहे. त्यामुळे महापालिका शाळा बंद असतील, असे शिक्षक संघटनेचे संजय येणारे यांनी कळविले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप आहे. २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करावी, कायमस्वरूपी सफाई व इतर सेवेतील ठेकेदारी पद्धत बंद करून आकृतिबंधामध्ये कायम कामगारांची पदे निर्माण करावी. राज्यातील बालवाडी व अंगणवाडी सेविकांना सेवेत कायम करून घ्यावे. ठेकेदारांकडील कामगारांना समान काम, समान वेतन द्यावे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करून वारसांना नोकरीत समाविष्ट करावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे.