शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराचा येरवडा कारागृहातच खून; ४ सराईतांकडून कात्रीने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 11:49 IST

पूर्ववैमनस्यातून कारागृहात घडलेल्या या खून प्रकरणाने खळबळ उडाली.

पिंपरी : कारागृहात असलेला पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवे याच्यावर कात्रीने हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारागृहात असलेल्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येरवडा कारागृहात सर्कल क्र. दोनमधील बरॅक क्रमांक एकच्या आवारामध्ये गुरुवारी (दि. २८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून कारागृहात घडलेल्या या खून प्रकरणाने खळबळ उडाली.

महेश महादेव चंदनशिवे (३१, रा. घरकुल, चिखली), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली), महेश तुकाराम माने (२४), गणेश हनुमंत मोटे (२४, दोघेही रा. सांगवी), आदित्य संभाजी मुरे, अशी संशयितांची नावे आहेत.

दरोड्याची तयारी करणे आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २०२२ मध्ये महेश चंदनशिवे याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पूर्ववैमनस्यातून चौघा संशयितांनी महेश चंदनशिवे याच्यावर केस कापायच्या कात्रीने व दरवाजाच्या बिजागिरीचा तुकड्याच्या सहाय्याने मानेवर व पोटाच्या बाजूला मारून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने चंदनशिवे याला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पिंपरी, चिखली, भोसरीत गुन्हे दाखल

मृत महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये २०१३ ते २०२२ या कालावधीत १२ गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्निशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महेश चंदनशिवे हा ३० नोव्हेंबर २०२२ पासून येरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन, बरॅक क्रमांक एकमध्ये बंदीस होता.

‘मोक्का’तील गुन्हेगारांनी केला खून

सांगवी येथील गणेश मोटे याची गुन्हेगारी टोळी आहे. तो टोळीचा प्रमुख असून, महेश माने हा टोळीतील सदस्य आहे. मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आहेत. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्यावर ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली. ‘मोक्कां’तर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली) हा पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२२ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू