पिंपरी : चप्पल शिवण्यासाठी थांबलेल्या कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (वय २१) याच्यावर सोमवारी (दि.२२) दुपारी पावनेदोनच्या सुमारास गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच त्याची चिखली परिसरात वाढत असलेली प्रतिष्ठा पाहून त्याची हत्या करण्यात आल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
सोन्या तापकीर यांचा मामा राजेंद्र कैलास कार्ले (वय ३८, रा.चांदुस, ता.खेड) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ उर्फे सोन्या पानसरे , सिद्धार्थ कांबळे ( दोघे रा. फलके वस्ती मोईगाव, ता.खेड) यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी कट रचून मागील वर्षी नवरात्र उत्सवादरम्यान पाटीलनगर, चिखली येथे आयोजित केलेल्या दांडिका कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या भांडण झाली होती. तसेच फिर्यादीचा भाचा सोन्या तापकीर याची चिखली परिसरात वाढत चाललेल्या प्रतिष्ठेचा राग मनात धरून गोळ्या झाडून त्याचा खून केला.