रावेत : झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी शहरात अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनाही सरसावल्या आहेत. खिळेमुक्त झाडे, ‘नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री’ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या अभियानांतर्गत प्राधिकरणातील झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांत अडीच किलो खिळे वृक्षप्रेमींनी काढले आहेत.खिळेमुक्त झाडे उपक्रमात पहिल्या टप्प्यात पुणेशहरात झाडांना खिळेमुक्त केले गेले. दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडमधील भेळ चौक ते बिजलीनगर चौकातील झाडांना खिळेमुक्त केले.झाडांना खिळेमुक्त करण्याबाबत या वेळी जनजागृतीही करण्यात आली. झाडांवर खिळे ठोकून त्यांना इजा पोहचवू नका, असे आवाहन या वेळी करण्यात आले. नगरसेविका करुणा चिंचवडे, वीर सावरकर मंडळ, पीसीसीएफ, स्वामी विवेकानंद केंद्र, डोनेटेड संस्था, जलपर्णीमुक्त अभियान, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरी-चिंचवड जैन महासंघ, निसर्ग राजा संस्था, माधव पाणी एसपी आस्पा संस्था, पिंपरी आणि आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला होता.
शहरात ‘नेल अन् पेन फ्री ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 3:14 AM