पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी महापौरांची बैठक महापौर दालनात झाली. विकास प्रकल्पांना माजी महापौर यांची नावे द्यावीत. जुन्या कोनशिला बदलण्यात याव्यात. पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या मेट्रोला पुणे मेट्रो असे नाव आहे, याबाबत शहरावर अन्याय झाला आहे. पिंपरी-पुणे असे नामकरण होणे गरजेचे आहे, अशी मागणीही महापौरांनी केली.महापौर दालनात नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ज्ञानेश्वर लांडगे, रंगनाथ फुगे, तात्या कदम, हनुमंत भोसले, माजी महापौर कविचंद भाट, आर. एस. कुमार, अनिता फरांदे, अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर उपस्थित होते. आजपर्यंत २४ महापौर झाले असून, त्यांपैकी ५ जणांचे निधन झाले आहे. उर्वरित १९ पैकी आठ महापौर उपस्थित होते.महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘राज्यातील महापौरांची महापौर परिषदेची बैठक नुकतीच पणजी-गोवा येथे संपन्न झाली. या बैठकीत आजी-माजी महापौरांना टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी, अशी मागणी केली आहे.’’महापौरांनी केल्या सूचना- विकास प्रकल्पांना माजी महापौराचे नाव द्यावे.- राज्य व राष्टÑीय महामार्गावर माजी महापौरांना टोलमाफी- शहरातील रखडलेल्या प्रकल्पांना गती द्यावी.- आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणले जावे.
मेट्रोचे नाव पिंपरी-पुणे हवे; माजी महापौरांनी केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 4:50 AM