शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नाशिक फाटा चौक ‘सिग्नल फ्री’ कधी?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 3:35 AM

कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूककोंडी सुटून सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. दरम्यान दुमजली उड्डाणपुलाला कासारवाडी व रेल्वे स्टेशन येथे नव्याने रॅम्प उभारण्यात आले आहेत.

पिंपरी  - कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूककोंडी सुटून सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. दरम्यान दुमजली उड्डाणपुलाला कासारवाडी व रेल्वे स्टेशन येथे नव्याने रॅम्प उभारण्यात आले आहेत. लवकरच हे रॅम्प वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने आतातरी नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. कासारवाडीहून भोसरीच्या दिशेला, भोसरीहून थेट पिंपळे गुरवला जाण्यासाठी तसेच पिंपळे गुरवहून भोसरीला जाण्यासाठी या पुलाचा उपयोग होत आहे. रेल्वे ट्रॅकसह नदी ओलांडून जाणारा हा एकमेव पूल आहे.दरम्यान, कासारवाडीहून पिंपळे गुरवकडे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात आला असून, हा रॅम्प पहिल्या मजल्याच्या पुलाला जोडतो. अशाच प्रकारे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, जगताप डेअरी येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वल्लभनगर येथे येण्यासाठी रॅम्प बांधणीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे थेट महामार्गावर येणे शक्य होणार आहे. या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूक सुरळित होऊन हा सिग्नल फ्री मार्ग होण्याची नागरिकांना आशा आहे.मेट्रो कामाचा अडथळासध्या पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून यासाठी ग्रेड सेपरेटरमध्ये पीलर उभारले जात आहेत. यामुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक बंद ठेवली जात असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीवर ताण येतो. सेवारस्त्याने पिंपरीहून नाशिक फाटा चौकात येणारी वाहने येथील अरुंद मार्गात अडकतात. अशावेळी सिग्नलमुळे वाहने मर्यादित वेगात धावतात. त्यामुळे मेट्रोच्या कामानुसार हा चौक सिग्नल फ्री करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.रॅम्प लवकरच खुलापिंपळे गुरवहून वल्लभनगरला येण्यासाठी बांधण्यात आलेला रॅम्प २९५ मीटर लांबीचा असून लवकरच हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड याभागातून वल्लभनगरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. वल्लभनगर येथे एसटी स्थानक असल्याने प्रवाशांसाठी हा रॅम्प सोयीचा ठरणार आहे.वाहनांची संख्या अधिकहा पूल जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असून या महामार्गावर धावणाºया वाहनांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, या पुलामुळे हा मार्ग सिग्नल फ्री होईल, असा दावा केला जात होता. मात्र, अद्यापही येथे सिग्नल कायम असून वाहनचालकांना सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबावे लागत आहे. या पुलाच्या सर्व रॅम्पचे काम पूर्ण करुन ते खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी