पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील जुन्या-नव्यांचा वाद उफाळून येत आहे. राष्टÑवादी आणि इतर पक्षांतून भाजपापत दाखल झालेल्या नेत्यांच्या ‘दादागिरी’बाबत जुन्या कार्यकर्त्यांनी आवाज उठविला आहे. गटबाजीही वाढीला लागली आहे. राष्टÑवादी बंडखोरांमुळे भाजपाच्या अस्वस्थ कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे.
शिवसेना आणि भाजपातील युतीबाबत चर्चा सुरू असताना भाजपाचे जुने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर पक्ष सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपाने राष्टÑवादी फोडण्याचे धोरण अवलंबिले आहे.
भोसरीतील अपक्ष आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे भाजपात दाखल झाले. आता
त्यांचे समर्थकही भाजपात प्रवेश करण्याचा धसका कार्यकर्त्यांनी घेतल्याने गटबाजीला खतपाणी मिळत आहे.
जुने कार्यकर्ते अस्वस्थ