मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच माध्यमातून झाला आहे. विकास कामांच्या जोरावरच शहरामध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता येऊन ‘हॅट्ट्रिक’ होणार आहे. यात जाधववाडी, मोशीतील नागरिकांचे देखील योगदान असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले. प्रभाग क्र. दोन जाधववाडी आणि मोशीमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार प्रा. कविता आल्हाट, शुभांगी जाधव, घनश्याम जाधव, राहुल बनकर यांनी सेक्टर क्र.१६ शिवतेजनगर येथे डायगोनल मॉलसमोर कोपरा सभा घेतली. या वेळी माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेविका साधना जाधव, नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, दत्ता जगताप, अॅड. शेखर गायकवाड, अॅड. विशाल जाधव, विठ्ठल आहेर, गणपत आहेर, शिवाजी बोराटे, मयूर बनकर, नरेंद्र बनकर, नारायण बोऱ्हाडे, भानुदास बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, मुरलीधर बनकर आदी उपस्थित होते.विलास लांडे म्हणाले, ‘‘या विकासामध्ये पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय, कुदळवाडी चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल, टेनिस कोर्ट, न्यायालय, ट्रॅफिक थीम पार्क, संत सावतामाळी उद्यान, मोशी प्राधिकरणातील व्हॉलीबॉल मैदान, जिल्हा औद्योगिक केंद्र, एमआयडीसी पोलीस ठाणे, केएसबी चौकातील उड्डाणपुलाचा समावेश आहे.’’(वार्ताहर)
विकासकामामुळे राष्ट्रवादीला यश
By admin | Published: February 13, 2017 1:41 AM