रहाटणी : प्रभाग क्रमांक २८ रहाटणी-पिंपळे सौदागरमधील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शीतल काटे, अनिता संदीप काटे, कैलास कुंजीर यांनी पिंपळे सौदागरमधील द्वारका सनक्रेस्ट फेज २-३, रोज कौटी, पाम ब्रीज, घरोंदा, विदा लोका, साई अॅम्बियंस आदी सोसायट्यांमधील परिसरात नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी संवाद साधताना नाना काटे म्हणाले, ‘‘वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने पारंपरिक ऊर्जास्रोतांचा पुरेपूर वापर करणे काळाची गरज आहे. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील अनेक गृहप्रकल्पांच्या इमारतींवर सौर पॅनल बसविले आहेत. सर्वांनी पारंपरिक ऊर्जास्रोतांचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे हे प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना जनजागृती करत होते.’’ ‘‘विविध सोसायट्यांमध्ये वीजनिर्मिती, अन्न शिजवण्यापासून ते पाणी गरम करण्यापर्यंत सौरऊर्जेचा वापर केला जातो. त्यामुळे लोकांची विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. महापालिकेने ग्रीन बिल्डिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलत देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला. मात्र, त्या आधीपासूनच कोणतीही सवलत आणि योजनेची वाट न पाहता आम्ही सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. परिसरात झालेल्या विकास कामाशिवाय पुढील पाच वर्षात प्रभागाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाची गंगा तळागाळात पोहचविण्याकरिता राष्ट्रवादीलाच साथ द्यावी, असे आवाहन नाना काटे मतदारांना करत होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी साधला संवाद
By admin | Published: February 13, 2017 1:50 AM