पिंपरी : प्रभागस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, महापालिकेत केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच अंतर्गत नाराजी दूर करणे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. प्रभाग दोन वा चार वॉर्डांचा होवो, या दृष्टीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षसंघटना सक्षमीकरणावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी नव्याने कार्यकारिणी जाहीर केली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभानिहाय पदाधिकारी नियुक्त करून जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. पक्षपातळीवर मेळावे घेणे, घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहे. या बैठकांत शहरातील विकासकामे यावर चर्चा केली जात आहे. राबविलेले प्रकल्प आणि प्रलंबित प्रकल्प यावरही चर्चा केली जात आहे. अशा प्रकारच्या बैठका पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. तीस टक्के भागांत बैठका सुरू आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांच्या गटांच्या माध्यमातून नागरिकांचा कौल काय आहे, नागरिक समाधानी आहेत का, विकासाविषयी नागरिकांचे मतही जाणून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)
पक्ष सक्षमीकरणावर ‘राष्ट्रवादी’चा जोर
By admin | Published: May 31, 2016 2:01 AM