शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीला बंडखोरीची डोकेदुखी

By admin | Published: February 14, 2017 2:08 AM

मावळ पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांवरील उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शेवटच्या

लोणावळा : मावळ पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांवरील उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शेवटच्या क्षणापर्यत मनधारणी करुनही सर्वसाधारण जागांवरील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बंडखोरी रोखण्यात मावळात राष्ट्रवादीला अपयश आले. भाजपाला मात्र बंडखोरी रोखण्यात यश आले आहे.राष्ट्रवादीच्या बंडखोरांना अद्दल घडविण्यासाठी त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांची २१ तारखेनंतर हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी जाहीर केले. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना डावलून घराणेशाहीचा कित्ता गिरवत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ढोरे, जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे व इतर नेते यांनी नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील बंडखोरांना एकत्र घेत समांतर राष्ट्रवादी पक्षांच्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन करत राष्ट्रवादीला शून्यावर आऊट करण्याचा मानस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी व्यक्त केला आहे. भाजपा मात्र बंडखोरांना रोखण्यात यशस्वी झाली असून आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सर्व बंडखोरांनी माघार घेतली. शिवसेनेने ऐनवेळी पक्षांचे वडगाव खडकाळा येथिल अधिकृत उमेदवार अनिकेत घुले यांची उमेदवारी माघारी घेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाबूराव वायकर यांना पुरस्कृत केले असल्याचे जाहिर केले. मात्र, वायकर यांनी मला शिवसेनेकडून याबाबत अधिकृतपणे काहीही कळविले नसल्याचे सांगितल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.(वार्ताहर)