पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी प्र्रभाग क्र. १७ चे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशाताई सूर्यवंशी, शोभाताई वाल्हेकर यांनी आज प्रचारफेऱ्या आणि गाठीभेटींवर भर दिला आहे. मतदार संवादावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. विकासाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची रणधुमाळी रंगात आली आहे. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी प्र्रभाग क्र. १७ मधील प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदार संवादावर भर दिला. पदयात्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ‘निवडून निवडून येणार कोण घड्याळाशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. पदयात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक असे विविध स्तरांतील नागरिक मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते. वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, दळवीनगर या भागातून पदयात्रा काढण्यात आला होती. ‘पिंपरी-चिंचवडचा विकास राष्ट्रवादीने केला आहे, त्यामुळे विकासाला साथ द्या, असे आवाहन उमेदवारांनी केले. या वेळी भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे शहराला बेस्ट सिटी, स्वच्छ शहर आणि प्रशासकीय गतिमानता अभियान असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या विकासाचे श्रेय कोणालाही नाकारता येणार नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विकासाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.’’(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा पदयात्रा, गाठीभेटींवर भर
By admin | Published: February 16, 2017 3:10 AM