शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची सरशी

By admin | Published: February 24, 2017 2:55 AM

जिल्हा परिषदेच्या देहू-लोहगाव गटामध्ये मंगल जंगम आणि हवेली पंचायत समितीच्या देहूगाव लोहगाव-निरगुडी

देहूगाव : जिल्हा परिषदेच्या देहू-लोहगाव गटामध्ये मंगल जंगम आणि हवेली पंचायत समितीच्या देहूगाव लोहगाव-निरगुडी वडगाव शिंदे गणामध्ये हेमलता काळोखे या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. या दोन्ही जागांसाठी अतिशय अटतटीशी लढत पाहायला मिळाली.अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर मंगल जंगम यांनी शिवसेनेच्या शैला खंडागळे यांच्यावर १८९ मतांनी विजय मिळविला. पंचायत समितीसाठी हेमलता काळोखे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी बंडखोर अपक्ष उमेदवार रत्नमाला करंडे यांचा ११७ मतांनी पराभव केला. समर्थकांनी ढोल-ताशा व डीजेच्या तालावर गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढली. काळोखे यांना ४२०१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार करंडे यांना ४०८४, शिवसेनेच्या सारिका शिंदे यांना २५६०, तर भाजपाच्या हेमा मोरे यांना २३०१ आणि कॉँग्रेसच्या वनिता देशकर यांना ३७१ मते मिळाली, १७० मतदारांनी नोटाचा वापर केला. देहूगाव-लोहगाव गटामध्ये राष्ट्रवादीच्या मंगल जंगम यांना ६५४४ मते मिळाली. शिवसेनेच्या शैला खंडागळे यांना ६३५५ आणि भाजपा-आरपीआय युतीचे संतोष चव्हाण यांना ५८४२ मते मिळाली. खंडागळे या देहूगाव ग्रामपंचायतीच्या तीन वेळा, तर चव्हाण हे एकदा सदस्य होते. १५ वर्षांपूर्वी हेमलता काळोखे यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मातोश्री सुरेखा कंद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. देहूगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान तीन सदस्या काळोखे, मोरे व करंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. यापैकी करंडे आणि मोरे यांनी सरपंचपद भूषविले आहे. (वार्ताहर)