मोशी : जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. पिंपरी-चिंचवड शहराचा ‘गाव ते आधुनिक स्मार्ट शहर’ असा विकास आदरणीय लोकनेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.जाधववाडी-मोशी प्रभाग क्रमांक दोनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रा. कविता संदेश आल्हाट, शुभांगी विशाल जाधव, घनश्याम शांताराम जाधव, राहुल वसंत बनकर यांच्या प्रचारार्थ कुदळवाडी येथे मलिक यांच्या सभेचे आयोजन केले होते. या वेळी हजारो अल्पसंख्याक नागरिक व मतदार उपस्थित होते.मलिक म्हणाले, ‘‘भाजपाचे नेते भयमुक्त आणि पारदर्शी कारभारावर बोलतात. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री भ्रष्टाचारी आहेत. पिंपरी-चिंचवड शहर भयमुक्त करू, असे म्हणतात. परंतु महापालिकेतील सत्ता काबीज करण्याचे षड्यंत्र आहे. आमच्या आखाड्यात तयार झालेल्या पैलवानांना घेऊन भाजपा सत्ता मिळवू शकत नाही. राष्ट्रवादी जसे पैलवान तयार करते, तसे त्यांना चारीमुंड्या चीत करून आसमान दाखवू शकते. ’’अरुण बोऱ्हाडे, फजल शेख, नगरसेविका साधना रामदास जाधव, राष्ट्रवादीचे शहरउपाध्यक्ष दत्ता जगताप, आनंदा यादव, अनिल आल्हाट, गणपत आहेर, प्रदीप आहेर, रामदास जाधव, रामचंद्र बोराटे, विनोद कांबळे, प्रदीप गायकवाड, एस.पठाण, नईम हाजी साहेब, याकुब खान, दिलीप बोऱ्हाडे, मुस्तफा खान, असगर हाजी, गुलाम चौधरी, अमिरूल्ला खान, वैभव बोऱ्हाडे, विनोद बोराटे, सुनील बोराटे आदी उपस्थित होते. प्रा. आल्हाट म्हणाल्या की, शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कारखाने आहेत. जाधव म्हणाले,‘‘विकासकामांच्या जोरावरच राष्ट्रवादीच्या पॅनलचा विजय होणार आहे. (वार्ताहर)
जातीयवादी शक्तींना रोखण्याची गरज
By admin | Published: February 17, 2017 4:56 AM