पिंपरी : पिंपरीतील भाजी मंडईची महापौर आणि आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर भाजी मंडईत तत्काळ सुविधा पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. परवानाधारक विक्रेते वगळता इतरांवर कारवाई करावी, रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशा सूचना प्रशासनास केल्या.कृषी उत्पन्न बाजार समितीस पिंपरी परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने महापालिकेस केली होती. त्यानुसार पिंपरी मंडईतील विविध समस्यांबाबत महापौरांनी महापालिकेतील अधिकारी आणि मंडईतील पदाधिकाºयांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी भाजीविक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत आढावा घेतला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी आठलाच महापौर काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत मंडईची पाहणी केली. सभागृह नेते एकनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, सचिव डॉ. पी. सी. खंडागळे, संचालक एकनाथ टिळे, पिंपरी मार्टचे विभागप्रमुख राजू शिंदे उपस्थित होते.महापालिकेने विकसित केलेल्या मंडईच्या पहिल्या मजल्यावर १४६ गाळे निर्माण केले होते. त्यांपैकी पहिल्या मजल्यावरील ९८ गाळे रिकामे आढळून आले. त्यांची पाहणी करण्यात आली. तसेच शगुन चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर अनधिकृतपणे फळ आणि फुले विक्री करतात. या परिसराशिवाय मंडईतील दुसºया मजल्यावरील गाळे वापराविनापडून आहेत. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे, या विषयीही प्रशासनाने लोकप्रतिनिधींना माहिती दिली.या वेळी व्यापाºयांनी प्रश्न मांडले. फुलांचा व्यापार करणाºयांना बसण्यासाठी गाळे नाहीत. पार्किंगला पुरेशी जागा उपलब्ध नाही. अनेक जण रस्त्यावर भाजी विकतात. मंडईत घाणीचे साम्राज्य पसरलेले असते, अशा तक्रारींचा पाढाच गाळेधारकांनी मांडला.
अतिक्रमणे हटविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:47 AM