शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

गुणीजणांचा गौरव आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:25 AM

सुभाष देसाई : उद्धवश्री पुरस्कारांचे भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात वितरण

पिंपरी : समाजातील प्रत्येक गुणवंतांचा गौरव करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना प्रमुखांनी गुणीजणांच्या पाठीवर थाप दिली. गुणीजण आपल्या विचारांचा, आपला पाठीराखा आहे का? याचा कधीच विचार केला नाही. अन्याय करणा-यावर आसूड ओढलेच, तसे समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भोसरी येथे व्यक्त केले.भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उद्धवश्री पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, संपर्कप्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेवक प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, समितीचे निमंत्रक, कामगार नेते इरफान सय्यद, अध्यक्ष माधव मुळे, सचिव गुलाब गरूड, अमित धुमाळ, भुषण कडू, पुजा माळेकर आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘समाजातील प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीच्या कार्यावर लक्ष ठेवून त्याचा गौरव केला. कवी कुसुमाग्रज यांचा जसा नाशिकला त्यांच्या घरी जावून सन्मान केला, तसा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा गौरव शिवसेनेच्या अधिवेशनात केला. शिवसेनेला कोणती व्यक्ती बाधक होईल, याची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही.’’बारणे म्हणाले,‘‘राजकारण बाजूला ठेवून समाजातील सर्वसामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचे उद्धव ठाकरे यांनी काम केले. त्यांच्या रुपाने स्पष्ट भूमिका मांडणारे आणि परखड विचार ठेवणारे नेतृत्व शिवसेनेला लाभलेले आहे, ’’शिवसेना प्रमुखांनी स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला आहे. शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्वांनी गट तट विसरून एकदिलाने काम करावे. भविष्यात पिंपरी-चिंचवड व मावळ भागातून दोन खासदार आणि तीन आमदार हे शिवसेनेचे असतील, असा विश्वास गोविंद घोळवे यांनी व्यक्त केला.सोहळा : मान्यवरांचा सन्मानक्रीडा क्षेत्रातील बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, अर्जून पुरस्कार विजेते मुष्टीयोद्धा गोपाळ देवांग, सरहद्दचे संजय नहार, एम. एम. हुसेन, उद्योजिका दिप्ती चंद्रचूड, दिग्दर्शक भाऊसाहेब कठहाडे, पत्रकार कैलास पुरी, सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, कामगार नेते किशोर ढोकळे, डॉ. पंकज बोहरा, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक गोविंद दाभाडे, सनदी लेखापाल डी. एम. खुणे, भूषण तोष्णिवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड