रहाटणी - लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही. आज वाढती महागाई व जाणवत असलेली अन्नाची टंचाई यामुळे सर्वसामान्यांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. यामुळे येणा-या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे.या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकते, हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. लग्नात वरवधूच्या मस्तकावर अक्षता टाकण्याची पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. यामागचे नेमके कारण कुणालाही माहीत नाही. पूर्वांपार चालत आलेली ही परंपरा आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते, हे सर्वांना कळते. मात्र वळत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सध्याच्या धावपळीच्या व महागाईच्या जमान्यात अनेक कुटुंब असे आहेत की आहे त्या अन्नाचे काय करायचे तर काही कुटुंब असे आहेत की एका वेळच्या जेवणाच्या अन्नासाठी काय करायचे अशी परिस्थिती आहे़ मात्र आपल्याकडे रूढी परंपरेच्या नावाखाली शेकडो किलो अन्न वाया जात आहे. हेच अन्न एखाद्या गरजवंताच्या मुखात गेले तर तो त्या नवदांपत्यास आशीर्वादच देतील. जर आपल्या देशाचा विचार केला तर लग्नातील अक्षदांच्या नावाखाली वर्षाला हजारो किलो अन्न वाया जाते यात शंका नाही. खरे तर समाजातील विचारवंतांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ वाया जाण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेले तर तो संतुष्ट तर होईल.धान्याची नासाडी थांबविण्याची अपेक्षादेशात अनेक कुटुंबाना एक वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावेलागत आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार लग्न समारंभात ज्वारी किंवातांदूळ अक्षता म्हणून वापरले जाते़ मात्र हे सर्व धान्य वायाच जाते. याचा फायदा कोणालाही होत नाही. त्यामुळे धान्य वाया घालण्या पेक्षा लग्न समारंभात फुलांचा वापर केल्यास देशातील बºयाच धान्याची नासाडी होणार नाही़ व ते पुढे उपयोगी येईल, अशी अपेक्षा काही सामाजिक संघटना व्यक्त करीत आहेत.
अक्षतांमधून धान्य नासाडी, तांदूळ व ज्वारीऐवजी फुलांचा वापर होण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:47 AM