लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नवविवाहितेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील भीमनगर येथे रविवारी रात्री घडली. पुष्पा हर्षद लोखंडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वायसीएम रुग्णालय पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नवविवाहितेने आत्महत्या केली. महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतर तिला तातडीने वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिसांना मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेबद्दल काही माहिती नव्हती. कोणीही याप्रकरणी फिर्याद दाखल केली नसल्याचे पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विवाहानंतर अवघ्या एका महिन्यात घडलेल्या या घटनेमुळे तिला सासरी त्रास दिला जात असावा. त्यामुळे ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नवविवाहितेची आत्महत्या
By admin | Published: July 04, 2017 3:57 AM