- रोहिदास धुमाळ- हिंजवडी : मुळशी तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. यामुळे गावागावांत, वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणि प्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करून साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वर करून निवडून यायचे. त्यानंतर वाद होण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या जास्तीत जास्त सदस्यांना सरपंच व उपसरपंच होण्याची संधी देण्याचा नवा मुळशी पॅटर्न सुरू झाला आहे. सध्या मुळशी परिसरातील राजकीय परिस्थितीत काहीसा बदल होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी एक पाऊल पुढे टाकत आपापसातील वाद मिटविण्यासाठी नवीन पॅटर्न सुरू केला आहे. विनाकारण वाद नकोत म्हणून निवडून आलेले आपले सदस्य खूश राहण्यासाठी पाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ केली आहे. मात्र दर चार, सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीमधील कारभारी बदलत असल्याने याचा थेट फटका गावातील मूलभूत सोयी सुविधांचे व्यवस्थापन व नियोजनबद्ध विकासकामांवर पडत आहे. अधिकार आणि निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था अगदी ग्रामपंचायतपर्यंत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास जलद गतीने होण्यासाठी सरपंच पाच वर्षांसाठी निवडला जात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी जलदगतीने निर्णय घ्यायचे असतात. मात्र, मुळशी तालुक्यात पत अन् प्रतिष्ठा सर्वांना मिळण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना आपले अधिकार आणि कर्तव्य याची पूर्ण माहिती होते ना होते तोच कारभारी बदलला जात आहे.वकास प्रक्रियेला अडथळाग्रामपंचायतीचे कारभारी सतत बदलत असल्याने निर्णय प्रक्रियाही बदलत आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. गावाच्या नियोजनबद्ध विकासापेक्षा महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी आपआपसात वाटून घेत आहेत. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ठराविक दिवसांनी सतत बदलत असल्याने पंचायत निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे कामाचा अप्रत्यक्ष ताण स्थानिक प्रशासनावर पडतो.........शासन निर्णयानुसार आता, सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे अशा प्रकाराला चपराक बसेल. मात्र उपसरपंच वारंवार बदलला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध विकासकामात अडचणी निर्माण होतात. विकास कामाला खिळ बसते. - संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग,जि. प. पुणे.
पत अन् प्रतिष्ठेसाठी गावचे कारभारी बदलाचा मुळशी पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 2:39 PM
गावागावांत, वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणिप्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्देपाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ