पिंपरी : महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अकरा नगरसेवकांची भर पडणार आहे. तर महापालिकेतील सदस्यसंख्या १३९ वर पोहोचणार आहे. नवीन अकरा सदस्यांना संधी मिळणार मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. यापूर्वी नगरसेवकांची संख्या १२८ होती. वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. १२ ते २४ लाखांच्या लोकसंख्येसाठी १३९ नगरसेवक हे सूत्र असणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत अकरांची भर पडणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२१मध्ये निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ३१०२ ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये चारशे ते आठशे लोकसंख्या राहणार असून १५० घरांची मर्यादेचा आहे. ३६ ते ४४ हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होईल. एका प्रभागात सुमारे चाळीस हजार लोकसंख्या राहील. तीन सदस्यांचे ४६ प्रभाग तर एक सदस्यांचा १ प्रभाग होणार आहे. १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका असणार आहेत. त्यामुळे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीचा महिलांना फायदा होणार आहे.दृष्टीक्षेपातजागा एकूण : १३९लोकसंख्या २०११ नुसार : १७ लाख २७ हजार ६९२मतदार संख्या २०११ नुसार- १३ लाख ५० हजारएकूण ब्लॉक-३१०२