शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

नववर्षाची सुरुवात सोनसाखळीच्या चोरीने, साडेसहा तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:13 AM

नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरु असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्याच दिवसाची सायंकाळ सोनसाखळी चोरांनी गाजवली सायंकाळी सहाच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलांचे लक्ष विचलित करून तब्बल साडेसहा तोळ्यांचे दोन लाखांचे दागिने हिसकावले.

वाकड - नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरु असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्याच दिवसाची सायंकाळ सोनसाखळी चोरांनी गाजवली सायंकाळी सहाच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलांचे लक्ष विचलित करून तब्बल साडेसहा तोळ्यांचे दोन लाखांचे दागिने हिसकावले. याप्रकरणी वाकड ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुनिता राजाराम चोगले (वय ६२, रा. गोल्डन पाम सोसायटी वाकड) व काशिबाई अरुण कलाटे (वय ५०, रा. शेडगेवस्ती वाकड) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत उपनिरीक्षक संगीता घोडे यांनी दिलेली माहिती अशी सायंकाळी सुनिता चोगले ह्या आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवून वाकड रस्त्यावरून परत घराकडे जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अंगात जर्किंग व डोक्यात टोपी घातलेले दोघे आले त्यांनी चोगले यांच्या जवळ जात मागे बसलेल्या इसमाने बिल्डिंगकडे हात दाखवीत हात हलविला चोगले यांचे लक्ष विचलित झाले व त्यांनी बिल्डिंगकडे पाहताच त्यांच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाची १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची गोल माळ चोरट्यांनी हिसकावून पळ काढला तर दुसºया घटनेत अशाच प्रकारे प्रेस्टीन ग्रँडीवर सोसायटीसमोरील रस्त्यावर काशिबाई कलाटे या आपल्या पतीसह वोकिंग करीत असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्याजवळ जात हातवारे करून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविले. अलीकडच्या काळात गेल्या दीड महिन्यात वाकड ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकाविण्याच्या सुमारे सात घटना घडल्या असून यात जेष्ठ महिलाच सहकार ठरत आहेत. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतरही आरोपी सापडत नसल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.आरोपींना तातडीने अटक करावी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड