निगडी - निगडी ते पिंपरी मार्गावर बीआरटीचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास तासाभराचा झाला आहे. निगडी येथील उड्डाणपूल सोडले की वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.येथील उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. येथे पीएमपी रस्त्याच्या बाहेर बस उभ्या करतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तिथून पुढे असलेल्या सिग्नलवर किमान पाच मिनिटे वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनाच्या मोठ्या रांगा लागतात. तेथून पुढे आल्यानंतर चिंचवड स्टेशन येथील दोन सिग्नलवरही हिच परिस्थिती आहे. तेथून पुढे मोरवाडी सिग्नलवर आल्यावरही वाहनचालकाला किमान पंधरा मिनिटे थांबावे लागते.नो पार्किंगचा अडथळाशहरामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने लावण्याचा नवा फंडा तयार झाला आहे. त्यामध्ये चिंचवड स्टेशन येथील पोलीस स्टेशनचा समावेश आहे. या पोलीस स्टेशनसमोर अनेक वाहने उभी केली जातात. पर्यायाने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी वाहने उभी करणाºयावर कारावाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच पिंपरीतही मुंबईकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे आहेत. या ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे हा रस्ता अरुंद होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पिंपरी-चौकात डावलले जातात वाहतुकीचे नियमपिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या ठिकाणी बिनधास्तपणे वाहने घुसवली जातात. वाहतुकबेटाला वळसा न घालता विरुद्ध दिशेने वाहने नेली जातात. त्यातच बीआरटीमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेची आहे.ग्रेड सेपरेटरमधीलही वाहतूक वळवलीग्रेड सेपरेटरमधील ही वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. मेट्रोची कामे सुरू असल्याने ग्रेडसेपरटेर बंद करण्यात आला आहे. काही ठिकाणी अंशत: सुरू आहे. परंतु वाहने एकाच लेनमधून जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.ही कामे सुरू आहेत. असा प्रकारचा कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाºया वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अनेक वेळा मेट्रोच्या पत्र्याला धडकून अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या ठिकाणी सूचनाफलक लावावेत अशी मागणी होत आहे.
निगडी ते पिंपरी : दहा मिनिटांचा प्रवास झाला तासाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:25 AM