पिंपरी : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सीआयआरटीतर्फे नाशिक फाटा येथील कार्यालयात सुरक्षित व शाश्वत सार्वजनिक वाहतूक या विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमालाही नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नवीन विस्तारात गडकरी यांच्याकडे नदी सुधार खात्याचा पदभार देण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवडशहरातील नदी सुधार प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. ‘सीआयआरटी’च्या कार्यक्रमानिमित्ताने गडकरी शहरात येणार असल्याचे नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची आशा शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
नितीन गडकरी आज उद्योगनगरीत, नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची शहरवासीयांमध्ये आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:13 AM