रावेत : शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत शहरात विविध वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत संदेश देणारे फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु गुरुद्वारा चौकात जनजागृतीची फलक लावले होते त्याच्या खालीच कचरा साचला होता़शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण १८ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती.केंद्र सरकारचे शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि मिशन निदेशक यांनी स्वच्छ शहर अभियान राबविण्याबाबत कळविले होते. कचरा समस्येकडे आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे फक्त स्वच्छ अभियानाचे होर्डिंग्ज लावून काही होणार नाही तर अशाप्रकारे कचरा फेकणाºयांवर पालिकेने कारवाईचा बडगा दाखवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक येणार म्हणून स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रबोधनाची मोहीम राबवली गेली. गुरुद्वारा चौकात सातत्याने कचरा फेकला जात असे़ येथे प्रशासनाने रंगरंगोटी करून परिसर सुशोभित केला आहे़याबाबत लोकमतने जनजागृती की अस्वच्छतेला प्रोत्साहन या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची पालिका प्रशासन आणि ब प्रभागाने दखल घेत ज्या ठिकाणी कचरा सातत्याने टाकला जातो अशा ठिकाणी साचलेला कचरा काढून तेथे रंगरंगोटी करून कचरा टाकणारी जागा आकर्षक केल्याने येथे सध्या कचरा फेकला जात नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वच्छतेबाबत महापालिकेला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:25 AM