पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावर दगड व झाडांच्या फांद्या टाकून रस्ते बंद केले आहेत. पुणे, मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये. यासाठी रस्ते बंद करून गावामध्ये येण्यास नो एंट्री केली आहे. साळुंब्रे गावातील ग्रामस्थांनी वेशीवरच रस्ता बंद केला आहे गावात नवीन येणा-या व्यक्तींची माहिती आशा अंगणवाडी सेविका यांना देण्यात यावी. जीवनावश्यक वस्तू घरपोच आणून दिल्याजातील त्यामुळे कोणीही गाव सोडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच देवले, पाटण साते ग्रामपंचायतीच्या हद्दीत साते, मोहीतेवाडी,विनोदेवाडी, ब्राह्मणवाडी, या गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.तर पवन मावळातील तीस गावांना जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने गावातील रस्ते सुरक्षेतेसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.